पुणे | प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्यातील सुमारे 13 तालुक्यांतील किमान 860 अंगणवाड्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण लिमिटेडच्या थकीत वीज बिलांमुळे आठवडाभर अंधारात आहेत. कोविड महामारीनंतर अधिकाऱ्यांनी बिले न भरल्याने या अंगणवाड्यांची प्रलंबित रक्कम गेल्या तीन वर्ष 1.33 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
अंगणवाडी शिक्षकांची संगणकासारखी उपकरणे आठवडाभरापासून बंद असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुलांनाही पंख्याविना अंधारात बसावे लागत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापैकी अनेक अंगणवाड्या या ग्रामपंचायतीच्या कम्युनिटी हॉलमधून चालवल्या जातात आणि प्रलंबित बिले संबंधित ग्रामपंचायतींनी भरायची होती, परंतु निधी अभावी बिले भरली गेली नाहीत. त्यानंतर महावितरणने त्यांचे कनेक्शन तोडले.
पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकूण 4 हजार 384 अंगणवाडी आहेत, त्यापैकी 860 ग्रामपंचायतीच्या कम्युनिटी हॉलमध्ये आहेत. या गावांतील ग्रामपंचायत सदस्यांचा असा दावा आहे की त्यांना राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निधी प्राप्त झाला नाही. अनेक विनंत्या करूनही ते वेळेत महावितरणाला पेमेंट करू शकले नाहीत.
पुणे ग्रामीण मधील अंगणवाड्या थकबाकीमुळे अंधारात












