सहकार खाते, महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका, पीसीएमसी, पीएमआरडीए, एनएससीसी, क्रेडाई, ड्रीम्स रिडेव्हलोपड, रोटरी क्लब आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी पुनर्विकास व स्वयंपुनर्विकास, सौर ऊर्जा व इतर अपारंपारिक ऊर्जा, रेन वॉटर व रुफ वॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा, स्वच्छ सर्वेक्षण या विषयांवर राष्ट्रीय प्रदर्शन व चर्चासत्राचे आयोजन शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या भूषविणार असून त्या उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ सुवर्णमहोत्सवी वर्षात म्हणजे ५०व्या वर्षात पदार्पण करत असून त्यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये, पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार, पुणे महानगरपालिका अति. आयुक्त श्री. कुणाल खेमनार, श्रीमती. पुर्वा केसकर (रोटरी), श्री. माधव जगताप (मनपा पर्यावरण खाते व शुद्ध हवा व इतर योजनांची माहिती), श्री. संदिप कदम (घन कचरा योजना)आदी मान्यवर विचार मांडणार आहेत.












