पुणे: एकीकडे आपला देश प्रगती पथावर असताना देशातला काही भागात अद्याप वीज नाही तर काही भागात रस्ते नाही तर काहींना मूळ भूत सुविधा मिळत नसताना चा चित्र आपल्याला पाहायला मिळतो अशाच एक भाग आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मौजे आंबेगाव हे महसूली गाव असून याठिकाणी एक कातकरी वस्ती आहे. मागील अनेक वर्षां पासून या ठिकाणच्या रहिवाश्यांकडून महसूल घेतला जात आहे मात्र नागरिक सुविधांकडून हे गाव अद्याप वंचित आहे. या आदिवासी कातकरी वस्तीला कोणतीच ग्रामपंचायत नाही. त्यामुळे त्यांना कोणत्याच नागरिक सुविधा मिळत नाही. त्यांच्या जन्माची नोंद होऊ शकत नाही वा त्यांच्या मृत्यूची नोंद होऊ शकत नाही.
सुमारे दहा वर्षापेक्षा जास्त काळापासून ही वस्ती शेजारच्या बोरघर ग्रामपंचायतीला जोडण्यासाठी किसान सभेचे प्रयत्न सुरु आहे. या वस्तीतील अनेकांनी हे काम करून घेण्यासाठी पुणे जिल्हा परिषेदेचे उंबर्डे घासले मात्र दहा वर्ष उलटले तरी ग्रामविकास विभागाकडे हा प्रस्ताव मान्यतेसाठी प्रलंबित आहे. या प्रस्तावावर जाणूनबुजून प्रशासन कानाडोळा करून आम्हाला बोरघार ग्रामपंचायतला जोडण्यास दिरंगाई करत आहे असे अरूप येथील नागरिक करीत आहेत. येथील नागरिकांचा संयमचा बंद आता तुटला असून येथील किसान सभेच्या वतीने आज पासून पुणे जिल्हा परिषद येथे आंदोलन पुकारण्यात आला आहे. या वस्तीतल्या महिला पुरुषांनी मुलाबाळांसह पुणे जिल्हा परिषदे बाहेर बेमुद्दत धरणे आंदोलन केला आहे. आमच्या प्रस्तावच निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे यांचे म्हणणे आहे.