पुणे प्रतिनिधी
पुणे दि.३० : गेल्या महिन्यात पुणे जिह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला घरफोडीच्या गुन्ह्यात समर्थ पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे. सुमित फ्रँकी हॉल (वय ३० रा. सोलापूर बाजार, कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून आरोपी विरोधात १४ गुन्हे दाखल आहेत.
पेट्रोलिंग दरम्यान सदर आरोपी मनुशहा मस्जित जवळ, रास्ता पेठ येथे एक संशयित इसम वस्तूंनी भरलेली मोठी गोणी घेऊन थांबला असल्याची माहिती पोलीस अंमलदार रहीम शेख व हेमंत पेरणे यांना गुप्त बातमी मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली. सदर आरोपीने पोलिसांना पाहून हातातली गोणी जागेवरच टाकून पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान गोणीतले साहित्य रेडचिल्ली हॉटेल शेजारी बंद असलेल्या भंगाराच्या गोडाऊन मधून चोरले असल्याचे सांगितले. सदर आरोपी विरोधात भा.द.वी कमल ४५४,४५७,३८० अंतर्गत समर्थ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक संदीप गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अशोक धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्थानक सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे, सौरभ थोरवे, सह पोलीस फौजदार दत्तात्रय भोसले, पोलीस अंमलदार रोहिदास वाघेरे, सोमनाथ धगे, जितेंद्र पवार, प्रमोद जगताप, गणेश वायकर, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी व शरद घोरपडे यांनी केले आहे.












