दारुच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना मांजरी येथील मोरे फार्म, शेवाळवाडी येथे घडली आहे. ही घटना शनिवारी (दि.२५) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संतोष भास्कर अडसूळ (वय ४१, रा. मोरे सोसायटीसमोर, शेवाळेवाडी, मांजरी फॉर्म, माजरी बुद्रुक, पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव असून, राहुल दत्तात्रय घुले (वय ४१, रा. मांजरी बुद्रुक) याच्यावर भा.दं.वि. कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत भास्कर तुकाराम अडसुळ (वय-६४ रा. शेवाळवाडी, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि राहुल एका बांधकामाच्या ठिकाणी दारु पित बसले होते. त्या वेळी आरोपीने एक महिन्यापूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरुन संतोष सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपी राहुलने संतोषला मारहाण करून, त्याला उचलून जमिनीवर डोके आपटले. त्यात संतोष बेशुद्ध पडला. ते पाहून राहुल पळून गेला. संतोष घरी न परतल्यामुळे त्याचे वडील घटनास्थळी गेले असता, त्यांना संतोष बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ हडपसर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी संतोषला रुग्णालयात नेले असता, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा तांत्रिक मदतीच्या सहाय्याने शोध घेऊन त्याला शेवाळवाडी याथील काळुबाई मंदिराजवळून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की, जुन्या भांडणाचा राग मनात धरुन संतोष याला हाताने चापट मारली. त्यानंतर त्याला जमिनीवर उचलून आपटून त्याला जीवे मारल्याची कबुली आरोपीने दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मंगल मोढवे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयकुत् प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ (अतिरिक्त कार्यभार परिमंडळ-५) संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त विशेष शाखा-१ विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक गुन्हे उमेश गित्ते यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, जोतीबा पवार, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे, अजित मदन, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अनिरुद्ध सोनवणे, अमोल जाधव यांच्या पथकाने केली.