पुणे : पुणे-अहमदनगर महामार्गावर पीएमपीएमएलच्या दोन बसची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात २९ प्रवासी जखमी झाले आहेत. तळेगाव धामढेरे येथून नगरपालिकेकडे जाणाऱ्या बसची वाघोलीकडून येणाऱ्या बसला धडक बसली आहे. हा अपघात आज (मंगळवारी) पहाटे घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव धामढेरे येथून नटावाडी डेपोची बस (सीएनजी 659 रुट क्र. 159/8) महापालिकेकडे येत होती. यावेळी पुणे-नगर महामार्गावरील जनकबाबा दर्ग्याजवळ बीआरटीमध्ये विरुद्ध दिशेने येणारी वाघोली डेपोची बस (क्र. ई 164 चालक क्र. डब्ल्यूटी 322 मार्ग 236/2) भरधाव वेगात समोरासमोर धडकली.
या अपघातात बस चालकासह 29 जण जखमी झाले आहेत. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमींच्या हाताला, चेहऱ्याला, पायाला मार लागला आहे. यात ८ महिला आणि १७ प्रवासी आणि चालक आणि वाहक दोघेही आहेत. सध्या कोणीही गंभीर जखमी नसल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे-नगर महामार्गावर पीएमपीएमएलच्या धडकेत २९ जण जखमी












