पुणे : पुणे लोकसभेचे महायुतीचे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक २९ एप्रिल रोजी पुण्यात येणार आहेत. यावेळी मोदींचा रोड शो होणार असून त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एस. पी. कॉलेजच्या मैदानात जाहीर प्रचारसभा देखील होणार आहे. या सभेत पंतप्रधान मोदी काय बोलणार हे महत्वाचे ठरणार आहे.
महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या खडकवासला येथील निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आधी कात्रज, एनडीए येथील मैदाने तसेच नंतर खडकवासल्यामध्ये जागेची चाचपणी करण्यात आली होती. मात्र, प्रशस्त मैदान नसल्याने स.प. महाविद्यालयाच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी सुरू झाली आहे. या सभेपूर्वी पुण्यात रोड शो देखील होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी सुरू झाली आहे. या सभेपूर्वी पुण्यात रोड शो देखील होणार आहे. पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर चाळीस हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था होऊ शकते. यासाठी येथील जागेवर ही सभा होणार आहे.
पुण्यातील मोदींचा रोड शो, तसेच जाहीर प्रचारसभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.
पंतप्रधान मोदी पुण्यातील जाहीर सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.