पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१९ : येत्या २९ जुलै रोजी मोहरम [ moharam ] सणाच्या पाश्वभूमीवर अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या अध्यक्षते खाली मोहल्ला कमिटी व शांतता समिती, मुस्लिम बांधवांसह येरवडा, विश्रांतीवाडी, चंदननगर, विमानतळ पोलीस स्थानकाकडील मुस्लिम धर्माचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संयुक्त रित्या समन्वय बैठकीचे आयोजन येरवडा पोलीस स्थानकात [ yerwada police station ] करण्यात आले आहे.
सदर बैठकी मध्ये मोहरम सण शांतते व उत्साहात करावा व सामाजिक सलोखा अबाधित ठेऊन आनंदीत पार पाडावा या विषयावर चर्चा झाली आहे. मोहरम सणा दिवशी ध्वनी प्रदूषणाचे [noise pollution ] उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. त्याच बरोबर मोहरम दरम्यान आक्षेपाहार्य घोषणाबाजी, प्रक्षोभक बॅनर किंवा भाषण करू नये. अशा सूचना देण्यात आल्या आहे.
सदर ठिकाणी पोलीस उप आयुक्त पऱि-४ शशिकांत बोराटे, सहा.पोलीस आयुक्त संजय पाटील, येरवडा विभाग, आरती बनसोडे, खडकी विभाग,दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, बैठकीस उपस्थित होते.












