पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १४ : पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या २१ पोलीस ठाण्यातील ८० दाखल गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेले ४ कोटी ७५ लाख ५३ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ रांजण गाव येथील एमईपीएल कंपनीच्या भट्टीत नष्ट करण्यात आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखाने संयुक्त रित्या ही कारवाई करण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि एकूण २१ पोलीस ठाण्यात मध्ये अंमली पदार्थ कायद्यानुसार दाखल ८० गुन्ह्यात मध्ये गांजा, एम.डी, कोकेन, हेरॉईन, पॉपीस्ट्रॉ, चरस अशा अंमली पदार्थांचा साठा आरोपींकडून जप्त करण्यात आला होता. नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ६७ लाख ७८ हजार वीस रुपये किंमतीचा ३३८ किलो ९०१ ग्रॅम २९१ मिलीग्रॅम गांजा, १ कोटी ६७ लाख १७ हजार २१५ रुपये किंमतीचा ०१ किलो ११४ ग्रॅम ४८१ मिलीग्रॅम एम.डी, २ कोटी १३ लाख ९४ हजार ४८५ रुपये किंमतीचा ०१ किलो ४२६ ग्रॅम २९९ मिलीग्रॅम कोकेन, १९ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा ०१ किलो ९६६ ग्रॅम चरस, २ लाख ८७ हजार ५३० रुपये किंमतीचा २८ किलो ७५३ ग्रॅम पॉपीस्टॉ आणि ४ लाख ०९ हजार ८७२ रुपये किंमतीचा १३६ ग्रॅम ६२४ मिलीग्रॅम हेराईन असा एकूण ४ कोटी ७५ लाख ५३ हजार रुपयांचा अंमली पदार्थचा साठा होता.
भारत सरकार अर्थ मंत्रालय, महसुल विभाग, नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या अधिसुचनेनुसार तसेच महाराष्ट्र शासन गृहविभाग (विशेष) यांच्या अधिसुचना व तरतुदीनुसार तसेच राज्याचे पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभागाच्या परिपत्रकानुसार मंगळवारी (दि.१२) पुणे शहर आयुक्तालयातील मुद्देमाल नाश कमिटीचे अध्यक्ष अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे कमिटी सदस्य पोलीस उपायुक्त पोलीस उपायुक्त मुख्यालय रोहिदास पवार सहायक रासायनिक विश्लेषक जि. भ. सदाकाळ, वैज्ञानिक सहाय्यक प्रादेशिक न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा पुणे प्र. अ. लेंडे, क्षेत्र अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ पुणे प्रमोद डोके, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बी विभाग विठ्ठल बोबडे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क जी विभाग एस.के. कोल्हे यांच्या उपस्थित अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला.












