पुणे दि. १५ : पुणे पोलिसांकडून पुन्हा एकदा कोम्बिंग राबवण्यात आले आहे. शहरातील विविध ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून १,८२४ जणांची झाडाझडती तर ५७७ जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवार दि.१४ रोजी रात्री ११ पासून ते शनिवार दि.१५ मध्य रात्री २ पर्यंत करण्यात आली. पुणे शहरातील सर्व पोलीस स्थानक व गुन्हे शाखेच्या वतीने ही मोहीम राबवण्यातर आली आहे.
सदर मोहिमे दरम्यान एकूण १३ आर्म अक्ट गुन्ह्यांमध्ये १३ आरोपींना अटक कारण्यात आली आहे. व त्याच्या कडून २ पिस्टल, ७ जिवंत काडतुसे, १२ धार दार हत्यारे असा एकूण ८५ हाजर पाचशे रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
तसेच परिमंडळ १ ते ५ पोलीस स्थानकांतच्या हद्दीत एकूण आर्म अक्ट प्रमाणे १३ कारवाईत १३ आरोपी अटक, मुंबई प्रोव्हिबिशन अक्ट ४३ कारवाईत ४४ आरोपी अटक,मोक्का क १४२ प्रमाणे ५ कारवाईत ५ आरोपी अटक , जुगार अक्ट प्रमाणे १९ कारवाईत ४६ आरोपींना अटक करण्यात आली असून एनडीपीएस अंतर्गत १ कारवाई करून १ आरोपी अटक करण्यात आला आहे. त्याच्या कडून नऊ हजार पाचशे रुपये किंमतीचे ३ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे.
पुणे शाखेने केलेल्या कारवाई मध्ये मोक्का क १४२ प्रमाणे कारवाई करून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कडून २ गावठी पिस्तूल व ७ जिवंत काडतुसे असा एकूण ८१ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई प्रोव्हिबिशन अक्ट प्रमाणे ६ कारवाईत ६ आरोपींना अटक करून रोख व गावठी दारू असा एकूण १३ हजार पाचशे वीस रुपये किंमतीचा मुद्दे माल व पोलीस स्थानका कडून ३७ कारवाईत ३८ अटक करून २९ हजार ऐंशी रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. महा. जुगार अक्ट प्रमाणे १८ कारवाईत ४२ आरोपींना अटक करू जुगार साहित्य व रोख रक्कम असा एकूण ३० हजार दोनशे तीस रुपये व गुन्हा शाखे कडून जुगार अक्ट प्रमाणे १ कारवाईत ४ आरोपींकडून ३ हजार एकशे नव्वद रुपये जप्त करण्यात आले आहे.
तसेच सीआरपीसी कायद्या अंतर्गत २४ आरोपींन विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. व ५ तडीपार गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ३९० हॉटेल, ढाबे,लॉजेस तपासण्यात आले. ८९ एस टी स्टॅन्ड, रेल्वे स्थानक, निर्जन ठिकाणे चेक करण्यात आले. पोलिसांकडून १,०५७ संशयित वाहन चालकांना चेक करून २९२ जणांवर कारवाई करत २ लाख सदुसष्ठ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.
ही कारवाई आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे ,अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील,अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा,पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त परि-१ संदीप सिंह गिल्ल,पोलीस उपायुक्त परि-२ स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त परि-३ सुहेल शर्मा, पोलीस उपायुक्त परि-४ शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त परि-५ विक्रांत देशमुख,पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कोम्बिंग ऑपरेशन राबविले.
पुणे पोलिसांची कोम्बिंग ऑपरेशन द्वारे धडक कारवाई












