पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १८ :
पुणे शहरातील विद्यार्थी, महिला तसेच नागरिक यांच्या सुरक्षेसाठी [ security ] आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.निर्भय विद्यार्थी अभियान [ fearless student campaign ] अंतर्गत पुणे पोलिसांच्या वतीने पोलीस काका, पोलीस दिदी, दामिनी पथक, बडीकॉप,परिवर्तन तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ चार चे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.
पुणे शहर पोलिसांच्या [ pune city police ] वतीने परिमंडळ चार विभागातील शाळांचे मुख्याध्यापक व सामाजिक संस्था यांच्यासोबत आयोजित संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे [ chief guest ] म्हणून अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा , सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे, राज्याच्या आरोग्य शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर,महापालिका माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा उबाळे, मुक्तांगण संस्थेच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर, एएम इन्फोवेब फाउंडेशनचे प्रमुख अली मर्चंट, संचालक अजीम शेख यांच्यासह निर्भय अभियानचे सुलभा क्षीरसागर, दिलीप कुऱ्हाडे, निखिल गायकवाड, विजय शिवले, पोर्णिमा गादिया, विवेक देव यांच्यासह परिमंडळाच्या विभागातील सर्व शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह वाढती व्यसनाधीनता व गुन्हेगारी [ addiction and crime ] रोखण्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने निर्भय विद्यार्थी अभियान हा उपक्रम नक्कीच उपयोगी ठरेल असे मत अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमात एएम इन्फोवेब फाउंडेशनच्या [ A.M infoweb foundation ] वतीने यावेळी परिमंडळ चार विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच फाउंडेशनच्या वतीने या अभियानासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यात येणार असून गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका वर्ग तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शाळा महाविद्यालयातून निर्भय मित्र व निर्भय सखी विद्यार्थी प्रतिनिधी नेमण्यात येणार असून त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांमध्ये समन्वय [ coordinator ] ठेवला जाणार आहे.
निर्भय विद्यार्थी अभियान मध्ये मुक्तांगण, सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प,सीवायडीए,लोकविकास मंडळ, पुणे जनकल्याण ट्रस्ट, स्पर्श सेंटर, स्त्री -आधार संस्था, महिला कल्याण केंद्र, मुस्कान, सर्व सेवा संघ,विती फाउंडेशन, ग्रीन तारा फाउंडेशन,होप या सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधींना विद्यार्थी सुरक्षा सह महत्त्वपूर्ण विषयांवर संवाद साधण्यासाठी विशेष प्रेरक प्रशिक्षण [special motivational training ] देण्यात आले असून परिसरातील शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येणार आहे.
यावेळी ग्रीन तारा फाउंडेशनच्या विद्यार्थिनींनी व्यसनमुक्ती जनजागृती पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप कुऱ्हाडे यांनी केले. सूत्रसंचालन विवेक देव यांनी तर आभार सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी मानले.












