पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०४ : कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.सोहेल नवाज शेख उर्फ पठाण ( वय २२ वर्षे, रा. स.नं. ५. आश्रफनगर, गल्ली नं. ११, कोंढवा बुद्रुक, पुणे ) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी याने त्याच्या साथीदारां सोबत कोंढवा आणि वानवडी परिसरात कोयता, चॉपर, तलवार, सुरा, लोखंडी रॉड या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राने साधी दुखापत करणे, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षांपासून त्याच्या विरुद्ध दहा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली श्री संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन पुणे व श्री. राजु बहिरट, पोलीस उप-निरीक्षक, पी.सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी आरोपीवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.












