
पुणे : चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. शुभम उर्फ ताया सुनिल दुबळे, (वय २१ वर्ष, रा. नऱ्हे) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपीने त्याच्या साथीदारांसह लोखंडी हत्यार, तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, लाकडी बॅट या सारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षामध्ये त्याच्या विरूध्द पाच गुन्हे दाखल आहेत.
या बाबत मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, आरोपी विरोधात एम. पी. डी. ए. कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे एक वर्षासाठी स्थानबध्दतेचे आदेश दिले आहेत. ही कारवाई करण्यामध्ये श्री. बालाजी पांढरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन पुणे व श्री. चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी. सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली आहे.












