क्राइम: सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रणदिवे यांच्यावर जुन्या वादातून धारदार शास्त्रांनी वार करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. बाळासाहेब रणदिवे (वय २८, रा. आंबेडकरनगर) हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते त्याचप्रमाणे बहुजन शक्ती सेनाचे ते अध्यक्ष होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब रणदिवे हे बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मार्केटयार्ड येथे थांबले असताना चौघे जण तेथे आले. त्यांनी जुन्या वादातून बाळासाहेब रणदिवे यांच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब रणदिवे यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यु झाला असल्याचा डॉक्तरांनी कळिवले. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपस मार्केटयार्ड पोलीस करीत आहेत.