पुणे बार असोसिएशनच्या माध्यमातून न्यायालय स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.”स्वच्छ न्यायालय-सुंदर न्यायालय”या ब्रीदवाक्यानुसार शिवाजी नगर जिल्हा व सत्र न्यायालयात “न्यायालय स्वच्छता अभियान”राबविण्यात आले.
न्यायालय स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही संबंधित ठेकेदार आणि सफाई कामगारांची असते परंतु त्यांनी ही जबाबदारी पूर्णपणे झटकली तसेच वारंवार पुणे बार असोसिएशनच्या माध्यमातून या प्रकरणी निवेदन देण्यात आले तरीही संबंधिताकडून दुर्लक्ष करण्यात येत होते.वारंवार निवेदन देऊन सुद्धा कोणतीच कारवाई केली जात नसल्याने शेवटी पुणे बार असोसिएशनने गांधीगिरीच्या माध्यमातून न्यायालय स्वच्छता मोहीम राबवून संबंधितांना जागे करण्याचा प्रयत्न केला.
या उपक्रमात पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड .श्री.केतन कोठावळे, उपाध्यक्ष अँड.जयश्री चौधरी -बिडकर, सचिव अँड.गंधर्व कवडे, अँड.राहुल कदम, खजिनदार अँड.समीर बेलदरे तसेच ऑडिटर अँड अजय देवकर तसेच ज्येष्ठ विधीज्ञ अँड.तुषार कोठावळे , पुणे लाॅयर्स कंजूमर सोसायटीचे संचालक विकास कांबळे यांच्या बरोबर अनेक वकील बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने सदर उपक्रमात सहभागी झाले.
स्वच्छता जनजागृती उपक्रम पुणे बार असोसिएशनच्या माध्यमातून राबविण्यात आल्याने सदर न्यायालयातील न्यायाधीश ,वकील बंधू आणि भगिनींनी तसेच इतर कर्मचारी यांनी या उपक्रमाचे गोड कौतुक केले आणि उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.












