पुणे बार असोसिएशनच्या वतीने महापालिका आणि बँकांच्या पॅनेलवर नियुक्त झालेल्या वकिलांचा सत्कार
पुणे बार असोसिएशन दैनंदिन पातळीवर विविध उपक्रमाचे आयोजन करत असते. त्या अनुषंगाने शुक्रवारी (दि ३०) रोजी पुणे बार असोसिएशन तर्फे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ विधीज्ञ मा. ॲड श्रीकांत कानेटकर यांचे घोषणा आणि कायमस्वरूपी मनाई दावे या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
तसेच या कार्यक्रमात बार मधील वकील बंधू भगिनींच्या दहावी व बारावी मध्ये ८५% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
पुणे महानगरपालिका तसेच विविध बँकेत संचालक म्हणून नियुक्त झालेल्या वकिलांचा देखील यावेळी पुणे बार असोसिएशन कडून सत्कार करण्यात आला
यावेळी अॅड गोरक्षनाथ काळे (पवना सहकारी बँक), ॲड.राजेंद्र उमाप (जिजामाता सहकारी बँक), ॲड.पांडुरंग थोरवे (जेजुरी देवस्थान), ॲड.गोरक्षनाथ झोळ (धर्मवीर संभाजी सहकारी बँक), ॲड.हेमंत सजोड (रामराज्य सहकारी बँक), ॲड. साकोरे (अण्णासाहेब मगर सहकारी बँक), ॲड.नरेंद्र धरणकिश कुलकर्णी (द विश्वेश्वर सहकारी बँक), ॲड.भाऊसाहेब शिंदे (तज्ञ संचालक), ॲड.इब्राहिम शेख (तज्ञ संचालक),दिलीप जगताप (कॅन्टोन्मेंट सहकारी बँक),अविनाश कवडे (चेतन शेवाळे सन्मित्र सहकारी बँक),ॲड. मनोज मोतीराम कदम(बँक महाराष्ट्राचे पॅनल अॅडव्होकेट) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुणे महानगरपालिका येथे नियुक्त झालेले अॅड. सुषमा मोकाशी (गावडे) ॲड. श्रीकांत मालेगावकर, ॲड.लीना कारंडे, ॲड.सुहास चौधरी,अॅड. दिप्ती माहुरकर,अॅड. शशिकांत जगताप,अॅड. रोहन करकंडे,अॅड. संजय मुरकुटे,अॅड. अनुराधा पडवळ,अॅड. प्रभूलिंग बिराजदार,अॅड. वर्षा जोशी,अॅड. जावेद खान,अॅड. समीर परांजपे,अॅड. आनंद बोत्रे,अॅड. वृषाली होळकर,अॅड. सोमेश्वर वाले,अॅड. प्रसाद टेमकर,अॅड. अविनाश पाठक,अॅड. संतोष शितोळे,अॅड. ऋषिकेश गानू,अॅड. सुचित्रा घोडके,अॅड. शिवाजीराव पाटील,अॅड. सुवर्णा शिंदे,अॅड. ज्ञानदेव चौधरी,अॅड. रमेश घोरपडे,अॅड. सतीश कुमार देशमुख,अॅड. मनोज साठे,अॅड. रोहन सराफ,अॅड. पराग कुलकर्णी, अॅड. सिद्धार्थ आंबेगावकर यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. केतन कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.












