७५ हजारापेक्षा अधिक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने केले अर्ज
पुणे मंडळ म्हाडातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ऑक्टोबर २०२३ च्या सोडतीच्या जाहिरातीस अनुसरुन ७५ हजारापेक्षा अधिक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले आहेत. यापैकी एकूण ५१ हजार ६०० अधिक नागरिकांनी अनामत रक्कम भरली आहे.
अनामत रक्कम जमा करण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत असून अर्जदारांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत तसेच ऑनलाईन पद्धतीने रात्री बारा वाजेपर्यंत अनामत रक्कम जमा करता येता येणार आहेत.
तरी अर्जदारांनी या संधीचा लाभ घेऊन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गृहप्रवेश करावा, असे आवाहन पुणे मंडळ म्हाडाच्यावतीने करण्यात आले आहे.












