पुणे : पुणे महानगरपालिकेत लोकसेवक म्हणून कार्यरत असलेल्या एकाला 1 लाख रूपयाची लाच घेताना अॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले आहे. अॅन्टी करप्शनने हा सापळा ३० जून रोजी रचला असून संबंधिताविरूध्द शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण दत्तात्रय पासलकर (वय 50, बिगारी, पुणे मनपा, पुणे) असे लाच घेणार्या लोकसेवकाचे नाव आहे. यामधील फिर्यादी हे आरोग्य विभागातून सन २०२२ मध्ये मुकादम म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या शिल्लक अर्जित रजेच्या रोखीकरणाचा बिलाचा चेक देण्यासाठी पुणे मनपातील प्रविण पासलकर यांनी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी फिर्यादी यांच्याकडे केली.
प्रविण पासलकर यांनी 1 लाख रुपयांची लाच पुणे मनपाच्या आवारात सरकारी पंचासमक्ष घेतली. त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
पुणे महापालिकेतील लोकसेवक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात












