पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.३१ : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेची पुणे-कडे जाणारी लेन (बाजूची) उद्या दोन तासांसाठी बंद राहणार आहे. लोणावळा एक्झिट येथे दुरुस्तीचे काम केले जाईल. त्यामुळे उद्या दुपारी दोन तास रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.
जुलै महिन्यात सातत्याने दरड कोसळल्याने हा रस्ता बंद करण्यात आला होता. त्यानंतर रस्त्यावरील ढिगारा हटवण्यासाठी प्रशासनाने रास्ता रोको केला. त्यावेळी दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र वाहतूक पूर्ववत होण्यास अधिक वेळ लागला.
पुन्हा एकदा मुंबई पुणे एक्स्प्रेस वे पुण्याकडे प्रशासनाकडून दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पुणे जुन्या महामार्गावर पुणे ग्रामीण पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.












