पुणे | प्रतिनिधी
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर स्तनदा मातांच्या सुविधेसाठी बेबी फीडिंग रूम ची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
पुणे प्रशासकीय विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे या प्रवाशांना प्रवासादरम्यान आणि रेल्वे स्थानकावर विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या अनुषंगाने पुणे रेल्वे स्थानकावर फ्लॅट फॉर्म क्रमांक एकवर असलेल्या लेडीज वेटिंग रूम मध्ये अर्भक स्तनपान कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या खोलीत खुर्ची, टेबल, पंखा, लाईट व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा कक्ष वेटिंग रूम मध्ये स्वतंत्रपणे उभारण्यात आला असून ही खोली आतून व बाहेरून बंद करता येते, त्यामुळे अधिक सुरक्षित आहे.
चाइल्ड हेल्प फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने खोलीची सुविधा करण्यात आली आहे. जेणेकरून स्टेशनवर ट्रेनची वाट पाहणाऱ्या महिला प्रवाशांना त्यांच्या मुलांना स्तनपान करताना सुरक्षित आणि आरमदायी वाटेल.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ मिलिंद हिरवे यांच्या नेतृत्वाखाली व पुणे स्टेशन संचालक मदनलाल माणा यांच्या समन्वयाने, रेल्वे प्रशासन हे सुविधा देण्यासाठी आघाडीवर आहे, व प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी पुढाकार घेतो.












