पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि १९ : रेल्वे सुरक्षा वाढवण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने पुणे विभागाने चिंचवड आणि खडकी स्थानकांदरम्यान स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग सुरू करण्याची घोषणा केली आहे. हे अपग्रेड रविवार 20 ऑगस्ट रोजी नियोजित आहे. ज्याच्या उद्देश्य ट्रेन ऑपरेशन्सची ऐकून कार्यक्षमता सुधारणे आहे. तथापि, अंमलबजावणीमुले अनेक रेल्वे सेवांवर तात्पुरता व्यत्यय निर्माण निर्माण होईल.
खडकी ते चिंचवड येथे सिग्नलचे काम असल्याने लोकल व दोन एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुणे स्टेशन ते लोणी, हडपसर भागातील ब्लॉक घेतला असून काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे.
पुणे जयपुर एक्सप्रेस गाडी पुण्याहून सायंकाळी पावणे सहा वाजता सुटेल तर दौंड – इंदोर एक्सप्रेस दौंडहून सायंकाळी ६ वाजता सुटेल. मुंबई चेन्नई लोकमान्य टिळक टर्मिनस काकीनाडा पोर्ट, मुंबई भुवनेश्वर, मुंबई हैदराबाद या गाड्यांना पुणे विभागातून धावताना आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील.
पुणे सातारा रेल्वे मार्गावरील निरा लोणंद स्थानका दरम्यान ब्लॉक घेण्यात आला. यात पुणे – कोल्हापूर डेमू एक्सप्रेस पुणे ऐवजी सातारा येथून कोल्हापूरसाठी रवाना होईल. त्यामुळे परतीचे प्रवासत ती गाडी कोल्हापूर ते सातारा अशी धावेल. सातारा ते पुणे अशी धावणार नाही. शनिवार चंदिगड – यशवंतपुर एक्सप्रेस दौंड – कुर्डूवाडी – मिरज या बदललेल्या मार्गाने धावेल. रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी १.५५ या दरम्यान हडपसर स्थांकावरून धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आलेले आहेत.
पुणे दौंड डेमू, दौंड पुणे डेमु या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुणे हबीबगंज रेल्वे पुणे स्थानकावरून दुपारी पाच वाजता सुटेल, हैदराबाद हडपसर ही गाडी दौंड स्थांनकापर्यंत धावेल. चेन्नई कुर्ला रेल्वे दौंड, मनमाड मार्गे धावेल.












