पुणे येथील अति वर्दळीचा ठिकाण असलेल्या शनिवार वाडा परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. शनिवारवाडा परिसरात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. सध्या वाडा पूर्णपणे रिकामा करण्यात आला असून बेवारस बॅगची तपासणी करण्याचे काम सुरु आहे.
शनिवार, रविवारी शनिवार वाड्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक व स्थानिक नागरिकांची गर्दी असते. राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक शनिवार वाडा पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे शनिवार वाडा परिसरात मोठा बंदोबस्त देखील असतो, सिक्युरिटी असते.
पोलिसांच्या कंट्रोल रुमला बेवारस बॅग आढळल्याचा फोन आला होता. त्यानंतर तात्काळ पोलीस आणि बॉम्बशोधक व नाशक पथक शनिवार वाड्यात दाखल झाले. पोलीस, बॉम्ब पथक आणि श्वानपथक या ठिकाणी उपस्थित आहे.
पर्यटक, सेक्युरिटी यांना बाहेर काढण्यात आले आहे. या बॅगमध्ये नक्की काय आहे? ही बॅग कोणी ठेवली आहे? याचा तपास सध्या सुरु आहे.