पुणे | प्रतिनिधी
पुणे: कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार आरोपी व रेकॉर्डवरील आरोपींचा तपास करत असताना कोंढवा पोलीस हद्दी मध्ये (ता.१९) पेट्रोलिंग दरम्यान, लुल्लानगर चौकात आले असता सह पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांना बातमीदार कडून माहिती मिळताच घटना स्थळी जाऊन आरोपी जयेश सुनील भंडारी (वय 22 रा. रुख्मिणी निवास, कृष्णा नगर, मंहमदवाडी) येथे राहत्या घरी आढळून आला आहे.
सदर आरोपीला वानवडी पोलीस ठाणे कडून पुणे शहरातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आले होते. घटना स्थळी आरोपीची चौकशी केली असता आरोपी हा जयेश सुनील भंडारे असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीला कोंडवा अथवा पुण्यामध्ये येण्याकरिता न्यायालयाची अथवा पोलीस उप आयुक्त परि-५ पुणे शहर यांचे परवानगी घेतली आहे का? याबाबत विचारणा केली असता त्याने कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले.
सदर आरोपी हा तडीपार कालावधीत कोणत्याही परवानगी शिवाय आला असल्याने आरोपी विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम.१४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त परि-५ विक्रम देशमुख, सह पोलीस आयुक्त वानवडी विभाग शाहूराजे साळवे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली आहे.












