पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १७ : पुणे शहरातील खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
आजम इक्बाल शेख ( वय २५, रा. भवानी पेठ, चुडामन तालीम समोर, पुणे ) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी आणि त्याच्या साथीदारांवर खडक आणि लष्कर पोलीस स्टेशनमध्ये सुरा, पालघन, तलवार, कोयता कोयता यांसारख्या हत्याराने खुनाचा प्रयत्न, खंडणी, सरकारी नोकरांवर हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, दुखापत, दंगा, बेकायदेशीर रित्या हत्यार बाळगणे यांसारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
त्यांच्या दहशतीमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस धोका निर्माण होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मा. पोलिस आयुक्त, श्री. रितेश कुमार यांच्या आदेशावरून आरोपीस एक वर्षासाठी एम.पी. डी. ए. कायद्यांतर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.












