पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २९ : पुणे शहरात दोन ठिकाणी चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बंडगार्डन आणि हडपसर परिसरात घडली आहे. पहिली घटना दि.२७ रोजी घडली असून दुसरी घटना दि. २० रोजी घडली आहे.
जितेंद्र कुमार शहा ( वय ३७, रा. कॅम्प पुणे ) यांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. तसेच एका महिलेने अज्ञात व्यक्तीविरुद्ध हडपसर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेले फिर्यादी यांच्याकडे आर्मी ऑफिसर्स कॉटर्स चे सर्व मेंटेनन्स चे काम आहे. त्यांच्या कॅम्पस परिसरामध्ये जंगली झाडे आणि चंदनाची झाडे आहेत. फिर्यादी यांच्या आर्मी ऑफिसर्स कॉटर्स च्या परिसरात असलेली एकूण २०,००० किमतीची पाच चंदनांची झाडे अज्ञात इसमाने कशाच्या तरी सहाय्याने कापून चोरी करून नेली आहेत.
तसेच हडपसर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेल्या महिला फिर्यादी यांच्या राहत्या बंगल्याच्या आवारात असलेली दोन चंदनाची झाडे अज्ञात इसमाने कशाच्या तरी सहाय्याने कापून चोरून नेली आहेत.
तुम्ही घटनांमधील आरोपींवर भादवि कलम ३७९ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार व पोलीस अंमलदार सुजाता गायकवाड हे करत आहेत.












