पुणे, दि. १९: पुणे महापालिकेच्यावतीने ‘माझी माती माझा देश’ अभियानाची सांगता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांच्या आयोजनाने २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता होणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.
केंद्र शासन व राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेच्यावतीने ‘माझी माती माझा देश’ हे अभियान पुणे शहरात मोठ्या उत्साहाने राबवण्यात आले. या अभियानाच्या समारोपाच्या अनुषंगाने हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालय शिवाजीनगर पोलीस वसाहती जवळ शिलाफलकाचे अनावरण व स्वातंत्र्यसैनिक आणि शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.












