बीड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी माननीय दिलीपजी जगदाळे यांची प्रति नियुक्तीने सहसंचालक शिक्षण आयुक्तालय पुणे येथे नियुक्ती झाल्याबद्दल दैनिक राज्य लोकतंत्रच्या वतीने त्यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या भेटी दरम्यान जगदाळे यांच्याशी विविध विषयांवर देखील चर्चा करण्यात आली. चर्चे दरम्यान जगदाळे यांनी त्यांची बीड जिल्ह्या प्रति आपली असलेली आपुलकीचे वर्णन केले. आपल्या अनुभवाबद्दल सांगताना त्यांनी
आपल्या २७ वर्षातील कार्यकारिणीची माहिती दिली. लोकतंत्रशी संवाद साधताना त्यांनी आपल्या कुटुंबाने विशेषतः त्यांच्या पत्नीने केलेल्या सहकार्य व केलेले त्याग याबद्दल ते बोलत होते.
जगदाळे यांनी आपल्या अनुभवातून दुर्गम भागात जाऊन एकनिष्ठतेने समाजासाठी कार्य केले आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांना अनेक चांगली लोक भेटल्याचा उल्लेख देखील त्यांनी या चर्चेत केला.
पुणे शहराला जगदाळे यांच्या सारखे व्यक्तिमत्व लाभणे शहराचे भाग्यच म्हणावे लागेल. त्यांच्या कार्यकारणीत त्यांनी अनेक शहरांना त्यांच्या कामातून आपलसं केलं आहे. त्यांचा अनुभव शहराच्या भाविताच्या दृष्टीने मोलाचे ठरणार आहे.
पुणे शहराला लाभणार दिलीपजी जगदाळे यांचे मार्गदर्शन












