
पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार पांडुरंग सांडभोर निवड झाली आहे. तसेच उपाध्यक्ष पदी दैनिक सकाळचे उमेश शेळके व महाराष्ट्र टाईम्सचे स्वप्निल शिंदे यांची निवड झाली असून सरचिटणीस पदी दैनिक तरूण भारतचे पत्रकार सुकृत मोकाशी व खजिनदार पदी दैनिक प्रभातच्या वरिष्ठ पत्रकार अंजली खमितकर यांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या पदाधिकार्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत
अध्यक्ष : पांडुरंग सांडभोर (दै. पुढारी)
उपाध्यक्ष : उमेश शेळके (दै. सकाळ), स्वप्निल शिंदे (दै. महाराष्ट्र टाईम्स)
सरचिटणीस : सुकृत मोकाशी (तरुण भारत)
खजिनदार : अंजली खमितकर (दै. प्रभात)
चिटणीस : पूनम काटे – कलापुरे (दै. राष्ट्र संचार)
प्रज्ञा केळकर – सिंग (दै. पुढारी)
कार्यकारिणी सदस्य
हर्ष दुधे (दै. महाराष्ट्र टाईम्स)
वरद पाठक (दै. महाराष्ट्र टाईम्स)
विक्रांत बेंगळे (दै. आज का आनंद)
शहाजी जाधव (दै. सकाळ )
श्रद्धा सिदीड (दै. महाराष्ट्र टाईम्स)
विनय पुराणिक (दै. पुण्यनगरी )
गणेश राख (दै.सामना )
संभाजी सोनकांबळे (दै.लोकमत)
शंकर कवडे (दै. पुढारी )
भाग्यश्री जाधव (दै. पुढारी )
अॅड. प्रताप परदेशी, अॅड. स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले आहे.












