पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बस अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर १६ जण किरकोळ जखमी झाले आहेत. दौंड तालुक्यातील पाटसमध्ये दि.२६ पहाटे ५ ते ५.३० च्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर महामार्गावर उमरगाहून पुण्याकडे खाजगी लक्झरी बस येत होती. या दरम्यान, उभ्या असलेल्या ट्रकला बस धकडली. अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर १६ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या जखमींना पाटस, दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
या अपघातात लक्झरी बसचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. तर सिमेंट मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधील सिमेंट मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.












