पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ३० :अॅड. प्रमोद नामदेव बोंबटकर यांच्याकडे ‘जिल्हा सरकारी वकील (DGP)’ पुणे पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या कार्यासन अधिकारी वैशाली बोरुडे यांनी २४ नोव्हेंबर रोजी काढला आहे.
सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुणे अॅड. नथुराम डी धायगावे-पाटील यांच्याकडे ‘जिल्हा सरकारी वकील (DGP)’ पुणे पदाचा पदभार होता. त्यांचा कार्यभार तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणण्यात येत असल्याचे सदर आदेशात नमूद आहे. अॅड. प्रमोद नामदेव बोंबटकर यांच्याकडे सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुणे यांच्याकडे पुढील आदेशापर्य़ंत ‘जिल्हा सरकारी वकील’ (DGP) पुणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
विधी व न्याय विभागाने शुक्रवारी (दि.१४) रोजी शासन आदेश काढून अॅड. प्रमोद नामदेव बोंबटकर यांच्याकडे ‘जिल्हा सरकारी वकील (DGP)’ पुणे पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.
२०१६ मध्ये बोंबटकर यांची अतिरिक्त सहकारी वकील म्हणून नेमणूक झालेली आहे त्यानंतर विविध प्रकारचे पोक्सो,मोक्का व आयपीसी सेक्शन च्या विविध कलमाखालील क्रिमिनल केसेस ते सरकारतर्फे लढतात व पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे पोक्सो संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना कशाप्रकारे तपास करायचा व कशाप्रकारे गुन्हा दाखल करायचा यासाठी ते मदत करतात.
माध्यमांशी बोलताना बोंबटकर म्हणाले की, पॉक्सो सारख्या केसेसमध्ये ज्या पीडित मुली आहेत. त्यांच्या सॅम्पल घेण्यासाठी सरकारने प्रत्येक तालुक्यात योजना करून सेंटर उभे करायला हवेत, सर्वसामान्यांना कायद्याबद्दलची माहिती असायला पाहिजे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सेक्स एज्युकेशन बद्दल शिक्षण देने तेवढेच महत्त्वाचे आहे. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन यासंदर्भातील काम केले पाहिजे. सरकारने सुद्धा शिक्षण पद्धतीमध्ये बदल करायला हवा. जेणेकरून पोक्सो सारखे गंभीर गुन्हे कमी होण्याची शक्यता आहे’.












