पुणे: नुकतीच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जेणेक दिग्गज नेते पराभूत झाले. आणि या पराभवाचे खापर त्यांनी ईव्हीएम वर फोडलं आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन मॅनेज केल्याचा आरोप या नेत्यांकडून केला जात आहे. याबाबत पूर्ण तपासणी व्हावी अशी अपेक्षा काही पराभूत नेत्यांनि व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे फेर मतमोजणीसाठी पुणे जिल्ह्यातील एकूण ११ उमेदवारांनी एव्हीएम पडताळणीसाठी पैसे भरून अर्ज केला आहे. मतदान यंत्र पडताळणीसाठी प्रत्येकी शुल्क आणि त्यावर जीएसटी असे एकूण ४७ हजार रुपये प्रति यंत्र याप्रमाणे शुल्क जमा करण्यात आले आहे.
प्रामुख्याने मतदान केंद्रावर पडलेली मते आणि प्रत्यक्षात पडलेल्या मतांमध्ये मोठी तफावत असल्याचा संशय या उमेदवारांना आहे. या शंकेचे निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांनी एकूण मतदान केंद्राच्या किंवा मतदान यंत्र संख्येच्या पाच टक्के या प्रमाणामध्ये मतदान यंत्रांची पडताळणी करून घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवाराने मध्ये हडपसर मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत जगताप, शिरूर राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक पवार, काँग्रेसचे पुणे कॅन्टोन्मेंटचे उमेदवार रमेश बागवे, राष्ट्रवादीचे खडकवासलाचे उमेदवार सचिन दोडके या वरिष्ठ नेत्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे.