पुणे प्रतिनिधी
पुणे शहरातील तळीरामांसाठी एका महत्वाची बातमी आहे. पुण्यात गणेशोत्सव काळात तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे. गणेशोत्सव कालावधीत शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती १९ आणि २८ सप्टेंबर रोजी बंद राहतील.
तसेच 29 सप्टेंबरला पुणे महानगरपालिका क्षेत्रात विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील आणि गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. यंदा राज्यभरात गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने पुणे पोलिसांकडून देखील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे.












