पुण्यात देहूरोड तेथे राष्ट्रिय अंध फुटबॉल खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलींच्या चौथ्या राष्ट्रिय स्पर्धेचे आणि मुलांच्या ८ राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन पहिले प्यारा ओलंपिक गोल्ड मेडलिस्ट स्विमर पद्मश्री चे पुरस्कार विजेते मुरलीधर राजाराम पेठकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन दिमाकात पार पाडले. पेठकर यांनी भारत पाकिस्तानच्या १९६४ च्या लढाईत लढताना नऊ गोळ्या खाल्ल्या आणि आज हि त्यांच्या मणक्यात एक गोळी अजून आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून १६ संघ आले होते आणि बारा राज्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. अशा पद्धतीची महाराष्ट्र झालेली ही दुसरी राष्ट्रीय स्पर्धा असून दोन मिनि टूर्नामेंट माई बाल भवन आणि इंडियन ब्लाइंड फुटबॉल यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात भरवण्यात आली आहे. आज पर्यन्त महाराष्ट्रातून खेळताना कोमल गायकवाड दिपाली कांबळे आणि भाग्यश्री रगी यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून. इंग्लंड आणि जपान या ठिकाणी देखील जाऊन यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आज एकूण चार सामने झाले असून.
1) उत्तराखंड विरुद्ध मेघालया १/१ हा सामना बरोबरी झाली असून या सामन्यात दोघांनी एक एक गोल केले , गुजरात वर्सेस नागालँड ड्रा झाला, हरियाणा विरुद्ध केरला ही मॅच देखील ड्रॉ झाली आणि दिल्ली विरुद्ध केरला यामध्ये दिल्ली एक शून्यने जिंकली.