पुणे : पुण्यातील वेल्हे येथे सावकारी लायसन्ससाठी लागणारा प्रस्ताव तयार करून, जिल्हा निबंधक कार्यालयात पाठपुरावा करून लायसन्स मिळवून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्यावंगी घटना समोर आली आहे.
पंढरीनाथ मच्छिंद्रनाथ तमनर. लिपीक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय,वेल्हे असे लाच मागणाऱ्या लिपिकाचे नाव आहे.
यावर अधिक माहिती अशी कि, तक्रारदार हे सावकारी लायसन्स मिळविण्याच्या कामासाठी सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय येथे आरोपीशी बोलणी केली. लोकसेवक पंढरीनाथ तमनर (लिपीक) यानी सावकारी लायसन्ससाठी लागणारा प्रस्ताव तयार करून, जिल्हा निबंधक कार्यालयात पाठपुरावा करून लायसन्स मिळवून देण्यासाठी 30,000/- रुपये व स्वत:साठी 20,000/- रुपये असे एकूण 50,000/- रुपये लाचेची मागणी केली व मागणी केलेली रक्कम अन्य व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये भरण्यास सांगितली.
संबंधित फिर्यादीच्या तक्रारीच्या अनुषंगाने लिपिक विरोधात सापळा रचण्यात आला व आरोपीला रंगे हाथ पकडण्यात आले.पोलीस निरीक्षक – संदिप व-हाडे, एएसआय मुकुंद अयाचित, पो.शि. भुषण ठाकुर,
चालक पो.ना. किरण चिमटे, ला.प्र.वि. पुणे यांनी सापळा रचून हि कारवाई केली आहे. हि कारवाई श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व श्रीमती शीतल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
वरील प्रमाणे लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पुण्यात लाच मागणाऱ्या लिपिकाचा पर्दाफाश












