पुणे | प्रतिनिधी
मुंबई, दि. १५ : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याच पक्षातून बाहेर पडून उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांच्या भेटीच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांच्या या भेटीमुळे राजकारणी आणि कार्यकर्ते यांच्यात अनेक तर्क – वितर्क लावले जात आहेत. यावर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.
चोरडिया नावाच्या उद्योगपतींच्या निवासस्थानी भेट झाल्यामुळे या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण “शरद पवारांची भेट घेताना मी लपून गेलो नाही, मी त्या गाडीत नव्हतोच. घराबाहेर कधी पडायचं हा माझा अधिकार आहे. पुतण्याने काकांची भेट घेतली यात गैर काय ? असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.












