पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१८ : जुन्या भांडणाच्या रागातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घृणपणे खून करणात आला आहे. ही घटना रविवारी (दि.17) रात्री हडपसर येथे घडली. या प्रकरणातील आरोपींना ह़डपसर पोलिसांनी ताब्यात घेतले असून स्वप्नील विठ्ठल झोंबर्डे (वय 17 रा. मिरेकर वस्ती , हडपसर )असे मयत तरुणाचे नाव आहे.
याप्रकऱणी विठ्ठल महादेव झोंबार्डे (वय – 46 , रा. मिरेकर वस्ती , हडपसर, मयत चे वडील) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी आरोपी सनी रावसाहेब कांबळे (वय -25), अमन साजिद शेख,(वय 22), आकाश हनुमंत कांबळे, (वय -23) व त्यांचे तीन अल्पवयीन साथीदार यांना अटक केली असून त्यांच्यावर खून व बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा स्वप्नील झोंबर्डे याला जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी संगनमत करून धारदार शस्त्रांनी वार केले. स्वप्नील याच्या डोक्यावर वार करून जीवे ठार मारले तसेच सनी कांबळे व अमन शेख यांनी त्यांच्याकडील धारदार लोखंडी हत्यारे हवेत फिरवून आमच्या सोबत कोणी पंगा घेतला तर असाच एकेकाचा मुडदा पाडू असे बोलून परिसरात दहशत पसरवली. हडपसर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून हडपसर पोलीस पुढील तपसा करत आहेत.












