पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २२ : शिरगाव परिसरात ८ जणांनी मिळून एका व्यक्तीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.ही घटना शिरगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
सचिन प्रतापराव नलवडे ( वय ३६, रा. शिराळा,सांगली ), प्रताप संपत सावंत ( वय ४२, रा. काळमवाडी,सांगली ), उमेश वसंत सावंत ( वय ३४, रा. काळमवाडी,सांगली ), राकेश सुधाकर गवंडी ( वय २८, रा. काळमवाडी,सांगली ), रोहित सर्जेराव पाटील ( वय २९ रा., येलुर,सांगली ), पोपट महादेव शिंदे ( वय ३३, रा.पाडळी,सांगली ) मनोज महादेव पाटील ( वय २८,रा.मागले,सांगली ), अक्षय मोहन गायकवाड ( वय २७ रा. येलुर, पुणे ) अशी आरोपींची नावे असून अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीच्या पत्नीने त्यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.
फिर्यादी महिलेच्या माहितीनुसार दि. २० रोजी त्यांचे पती बाबासाहेब आनंदा कुंभार ( वय ४२ ) हे त्यांची गाडी रिपेअरिंग साठी अभिमान सोसायटी जवळील गॅरेज मध्ये जात होते.त्यावेळी आरोपींनी पैशांच्या व्यवहारातून त्यांचे अपहरण केले असल्याचे दिसते.
आरोपींवर भादवी कलम ३६३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गाडीलकर हे करत आहेत.












