पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : पैसे उसने मागायला गेलेल्या तरुणींशी वाईट वर्तवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे.ही घटना निगडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी एका महिला फिर्यादीने आण्णा धोत्रे ( रा. ओटास्किम निगडी ) याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
दि. २४ रोजी फिर्यादी या त्यांच्या मैत्रिणीसोबत आरोपी याच्याकडे पैसे उसने मागण्यासाठी गेल्या होत्या.त्यावेळी आरोपीने मी पैसे उसने देतो त्याबदल्यात शरीरसुखाची मागणी फिर्यादी यांच्याकडे केली. तसेच फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणीसोबत गैरवर्तन करत तू पोलिसात तक्रार दिली तर तुला बघुन घेईल अशी धमकी दिली.
आरोपीवर भादवी कलम ३५४ ( अ ), ५०६ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला ताब्यात घेण्यात आले नाही.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गिरी गोसावी हे करत आहेत.












