पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०९ : पैसे दिले नाही म्हणून शिवीगाळ करत दुकानाचे नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून जयदीप पांडुरंग अडाळगे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी यांचे कस्तुरबा वसाहत येथे स्वतःचे दुकान आहे. ते आपल्या दुकानात थांबले असताना आरोपी यांनी फिर्यादी यांच्याकडे पाचशे रुपयाची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता त्या रागातून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच दुकानावर दगड मारून दुकानाचे नुकसान केले आहे.
आरोपीवर भादवि कलम ३८५,३३६,४२७,५०४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाडेकर हे करत आहेत.











