पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १२ : पैसे देण्यास नकार दिल्याने पोटच्या मुलानेच आईला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून आईने अतुल सुगंधराव खंडागळे ( वय ३० वर्षे रा. गांधी नगर महिंद्रा अँन्थीया समोर हनुमान मंदिरा मागे पिंपरी पुणे ) या स्वतःच्या मुला विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी ह्या भावाला शाहूनगर, चिखली येथे त्याला भेटायला जाण्यासाठी गांधीनगर कमानी समोर आल्या होत्या.त्यावेळी फिर्यादी यांचा मुलगा तेथे आला व त्याने फिर्यादी यांच्या कडे ऑटो रिक्षा खरेदीसाठी पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच जवळ पडलेला दगड फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले आहे.
आरोपीवर भादवी कलम ३२४,५०४,५०६ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार दळवी हे करत आहेत.












