पुणे प्रतिनिधी
पुणे दि. १० :मुंढवा पोलीस स्थानक येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या आरोग्य तपासणी करण्या करिता मुंढवा पोलीस स्थानक व सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि.१० रोजी सकाळी १० वा. करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घटन पूर्व प्रादेशिक विभाग, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमा- करिता पोलीस उप आयुक्त परी-५, विक्रांत देशमुख, सहा. पोलीस आयुक्त अश्विनी राख, हडपसर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तांबे मुंढवा पोलीस स्थानक,पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सह्याद्री हॉस्पिटल कडील डॉ. प्रसाद जाधव, डॉ. विजय गायकवाड, डॉ. शुभम श्रीवास्तव, डॉ.रमेश नवले, डॉ. रोशनी जाधव, डॉ.प्रेमनाथ मोरे, डॉ.विराज साकले तसेच मुंढवा पोलीस स्थानक कडील ७० ते ८० अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
सदर शिबिराच्या माध्यमातून अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा व इतरांनी उपस्थित अधिकारी व अंमलदार यांना स्वतः चे आरोग्य व शरीर स्वाथ्य तसेच व्यसनमुक्ती,दैनंदिन कामा बरोबर ध्यान, योग, व्यायाम विषयी मार्गदर्शन केले. सदर शिबिरामध्ये अधिकारी व अंमलदार यांच्या सी.बी.सी.शुगर, लिक्विड प्रोफाइल इत्यादी तपासण्या करून घेण्यात आल्या आहेत. सह्याद्री हॉस्पिटल टीमकडून चांगल्या प्रकारे तपासणी करण्यात आली आहे. सदर सर्व अधिकारी व अंमलदार सहभाग नोंदून सहकार्य केले आहे.
सदर शिबिराचे आयोजन पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहा.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप आयुक्त परी-५, विक्रांत देशमुख,सहा. पोलीस आयुक्त अश्विनी राख,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तांबे,पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे,अंमलदार तानाजी देशमुख, स्वप्नील शिवरकर, रवींद्र देवढे, शीतल काळे यांच्या स्टाफने केले आहे.












