पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २८ : पोलीस आयुक्तालय पुणे शहर यांच्या कल्पनेतून परिमंडळ दोन मधील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्यामध्ये उत्साह निर्माण करून मनोबल वाढवण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ पुणे शहर यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या कार्यशाळेत श्री राजेंद्र भिडे यांनी “संवाद कौशल्य” श्रीमती सीमा देसाई – नायर यांनी “मनाची भाषा” व “न्युरोल्यूजेस्टीक चे दैनंदिन जीवनातील फायदे” व श्री. नारायण शिरगावकर, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांनी “समज गैरसमज” तसेच डॉ. दत्ता कोहीनकर यांनी “तणावमुक्त जीवन” अशा बऱ्याच विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.

तसेच मा. श्रीमती. स्मार्तना पाटील (भापोसे), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, पुणे शहर यांनी उपस्थित अधिकारी व अंमलदार यांच्या अडचणी व सुचना ऐकून त्या सोडविण्याचा प्रयत्न करून त्यांच्यातील आत्मविश्वास, मनोबल वाढवू व त्यांच्या जीवनात उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.
या कार्यशाळेचे आयोजन स्वारगेट पोलीस विभागाचे सहा. पोलीस आयुक्त, श्री. नारायण शिरगावकर, श्री. सुनिल झावरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन, श्री. सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, गुन्हे स्वारगेट पोस्टे, स्वारगेट पोस्टे कडील सपोनि. संदे, सपोनि. काकरे, सपोनि अश्विनी बावचे पोलीस उप निरीक्षक श्रीमती राजश्री पाटील, श्रीमती किर्ती चाटे, पोलीस उप-निरीक्षक येवले व स्वारगेट पोस्टे कडील सर्व पोलीस अंमलदार यांनी केले असून परिमंडळ – २ विभागातील एकूण १६ पोलीस अधिकारी व ११२ पोलीस अंमलदार या कार्यशाळेमध्ये उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहा. पोलीस निरीक्षक, अश्विनी बावचे, स्वारगेट पोस्टे पुणे शहर यांनी केले.












