पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.०७ : पुणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ ४ मध्ये जबरी चोरी करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी ओळख परेड घेतली. परिमंडळ ४ मध्ये होणाऱ्या जबरी चोरींना आळा बसावा तसेच पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपींच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीची परिमंडळातील इतर पोलीस स्टेशनला ओळख व्हावी यासाठी आरोपींच्या आदान-प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम गुरुवारी दि.०६ रोजी घेण्यात आला.
आरोपींच्या ओळख परेडमध्ये प्रत्येक आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत तसेच त्यांच्या गुन्हेगारी अभिलेख यांचे आदान प्रदान करण्यात आले. परिमंडळ ४ मधील ६५ सराईत गुन्हेगारांच्या माहितीचे आदान प्रदान करण्यात आले.
या ओळख परेड तसेच आदान प्रदान कार्यक्रमास श्री. शशिकांत बोराटे पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन श्री. बाळकृष्ण कदम, सपोनि.गजानन जाधव लोणीकंद पोलीस स्टेशन, सपोनि.विजय चंदन विमानतळ पोलिस स्टेशन, पोउपनि. अंकुश डोंबाळे येरवडा पोलीस स्टेशन, पोउपनि.रवींद्र कुमार वारंगुळे येरवडा पोलीस स्टेशन, पोउपनि. लहू सातपुते विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, पोउपनि.रुपेश चाळके चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन, पोउपनि. वैभव मगदूम खडकी पोलीस स्टेशन व पोउपनि.दिलीप पालवे चंदन नगर पोलीस स्टेशन अशा सर्व पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. परिमंडळ ४ मधील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींच्या आदान-प्रदानाचा कार्यक्रम यापुढेही नियमित सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ यांनी दिली आहे.












