पुणे दि.१७ : होप फॉर दी चिलड्रन्स फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने २३ पोलीस स्टेशनमध्ये बाल स्नेही कक्षाचे उद्घाटन पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते मंगळवार (दि १५) रोजी करण्यात आले आहे.
यावेळी पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, अपर आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, अपर आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री रंजन शर्मा, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ- १ श्री. संदिपसिंह गिल, सह. पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अश्विनी राख, सह. आयुक्त फरासखाना विभाग अशोक धुमाळ व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश शिंदे, श्री विष्णु ताम्हाणे, भरोसा सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, संगिता जाधव व इतर पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच होप फॉर चिल्ड्रेन फाऊंडेशनच्या संस्थापिका कॅरॉलीन व त्यांची टीम इतर ग्रामस्थ तसेच बाल वृंदावन उपस्थित होते.

स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३२ पोलीस स्टेशन पैकी २३ पोलीस स्टेशनमध्ये बाल स्नेही कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
समर्थ, मुंडवा, कोंढवा, वानवडी, मार्केटयार्ड. बिबवेवाडी, हडपसर, या पोलीस स्टेशन मध्ये स्थापन करण्यात आलेल्या बालस्नेही कक्षाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. बालस्नेही कक्षामध्ये विधीसंघर्षग्रस्त बालके आणि काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालकांचे समुपदेशन व वेग-वेगळ्या स्वययंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्होकेशनल कोर्सेसचे प्रशिक्षण देऊन, त्यांचे पुनर्वसन करण्याकरिता मदत केली जाते. त्याकरिता पुणे शहर पोलीस आयुक्तालयात सर्व पोलीस स्टेशन मध्ये बाल कल्याण पोलीस अधिकारी यांची नेमणुक करण्यात आलेली आहे.












