पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.०२ : पोलिस उप निरीक्षका वर लाच मागितल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ही घटना विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली असून एका फिर्यादी यांच्या तक्रारी वरून शंकर धोंडीबा कुंभारे या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदार यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची चौकशी आरोपी हे करत होते.त्यावेळी तक्रारदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी आरोपीने त्यांच्याकडे ५०,००० रुपयांची मागणी केली.
तक्रारदार यांनी आरोपीने त्यांच्याकडे लाच मागितल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीची शहानिशा केली असता आरोपीने ५०,००० रुपये लाच मागितली असून तडजोड करून ३०,००० लाच घेण्याचे कबूल केले.आरोपीने १५,००० रुपये लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर हे करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र,मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.












