पुणे दि १ : सोशल मीडियाचा वापर करून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बिबवेवाडी परिसरात अशीच एक घटना घडल्याचे समोर आले आहे. हि घटना शुक्रवार दि.३० सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. स्काईप अँप या ऑनलाईन माध्यमाचा वापर करून हि आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याची तक्रार हि एका महिलेने (वय २५ रा. बिबवेवाडी) बिबवेवाडी पोलीस स्थानकात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिला या घरी असताना त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. महिलेचा संभाषणातून विश्वस संपादन करून आरोपीने महिलेला अँप डाउनलोड करण्यास सांगितले. आरोपी याने पोलीस असल्याचे भासवून फिर्यादी महिला या कोणत्याही मनी लॉन्ड्रिंग मध्ये सहभागी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी अकाउंट वर पैसे पाठवण्यास सांगितले. आरोपीने महिलेची एक लाख चौर्याहत्तर हजार सहाशे एकतीस रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात बिबवेवाडी पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं.११८/२०२३ भा.द.वि.४१९,४२० माहिती तंत्रज्ञ कायदा कलम ६६(सी),६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपस पोलीस निरीक्षक (गुन्हे), अनिता हिवरकर करीत आहे.
पोलीस असल्याचे भासवून महिलेला आर्थिक गंडा












