पुणे | प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र पोलीस दलामार्फत महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन ०१ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या दरम्यान करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन पद्मविभूषण पुरस्कार भारत सरकार याने सन्मानित डॉ. रघुनाथ माशेलकर, भारतीय शास्त्रज्ञ यांनी केले.
या मेळाव्यामध्ये सायंटिफिक एड्स टू इन्वेस्टीगेशन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये नंदकुमार गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, ज्योती मेढे सहा. पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, चैत्राली गपट पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखा, आर. एच. घोलप पोलीस हवालदार, उत्कर्षा वाघ महिला पोलीस अंमलदार गुन्हे शाखा, यांनी सहभाग घेतला होता.
सायंटिफिक एड्स टू इन्वेस्टीगेशन या सदराखाली फिंगरप्रिंट या विषयात ज्योती मेढे यांनी रौप्य पदक, फॉरेन्सिक सायन्स या विषयात चैताली गपट यांनी रौप्य पदक, तसेच बॉम्बे शोधक व नाशिक पथक, पुणे शहर मधील डॉग विराट व त्यांचे हॅन्डलर हवालदार 5824 शैलेश शिरतोडे, बी.डी.डी.एस पुणे शहर यांना या एक्सप्लोजीव्ह या प्रकारात रौप्य पदके मिळाले आहेत.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे सायंटिफिक एड्स टू इन्वेस्टीगेशन या टीमला उत्कृष्ट सांघिक कामगिरी करता सांघिक पारितोषिक देण्यात आले. सदर कार्यक्रमाचा सांगता समारंभ पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई श्री रजनीश शेठ यांच्या उपस्थितीत पार पडला.












