पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका युवतीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०१७ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत शिवाजीनगर गावठाण येथे घडला आहे.
याबाबत ३३ वर्षीय युवतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन किरण माणिक महामुनी (वय-३८ रा. नागपुर) याच्यावर भा.दं.वि. कलम ३७६, ३७७, ३१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण महामुनी पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. पीडित युवती पोलीस भरतीची तयारी करत असताना त्यांची किरण सोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने पीडितेला शिवाजीनगर गावठाण येथील एका घरी नेले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने पीडित युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. हा प्रकार समजल्यानंतर किरण महामुनी याने पीडितेला जामखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण महामुनी पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. पीडित युवती पोलीस भरतीची तयारी करत असताना त्यांची किरण सोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने पीडितेला शिवाजीनगर गावठाण येथील एका घरी नेले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
आरोपीने पीडित युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली.
हा प्रकार समजल्यानंतर किरण महामुनी याने पीडितेला जामखेड तालुक्यातील एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.