आपण एस टी स्टॅन्ड , रेल्वे स्टेशन आणि सार्वजनिक वाहतूक ठिकाणी पाहतो चोरांपासून सावधान !! असाच एका दांपत्यांना प्रवासात चोरीच्या घटनेला सामोरे जावे लागले आहे. फिर्यादी सारंग उजवणे (रा शिवनेरी पार्क पुणे ) आपल्या पत्नी सोबत अकोल्याहून पुण्यात खासगी ट्रॅव्हल्स ने संगमवाडी यथे उतरले. पुढे जाण्यासाठी त्यांनी रिक्षातून संचेती हॉस्पिटल येथे पोहचले. लॅपटॉप ची बॅग पाहिली असता त्यांना कळाले कि प्लास्टिक च्या पाऊच मध्ये ठेवलेलं रु १.२२.००० रुपय सोन्याचे दागिने चोरीला गेले आहे.
शिवाजीनगर पोलीस स्टेशन या चोरीचा गुन्हा मध्ये भादविक ३७९ अंतर्गत अज्ञात आरोपी विरोधात दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा सदरतपास पोलीस करत आहेत
प्रवासात दागिने चोरीला












