मुंबई : प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे सोमवारी वयाच्या ७२ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. उधास कुटुंबीयांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “अत्यंत जड अंत:करणाने, 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाल्याची माहिती देताना आम्हाला दुःख होत आहे.” या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे.
त्याच्या मृत्यूवर पहिली प्रतिक्रिया सोनू निगमयांनी दिली., “मेरे बचपन का सबसे महत्वपूर्ण हिस्सा आज खो गया है. श्री पंकज उधास जी, मैं आपको हमेशा याद करूंगा. यह जानकर मेरा दिल रोता है कि आप नहीं रहे. जीवन का हिस्सा होने के लिए आपका शुक्रिया. शांति.